बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान लवकरचं पडदयावर एक मोठा प्रोजेक्ट घेऊन येत आहेत. तब्बल 2 वर्षांनंतर पुन्हा सिनेमाच्या सेटवर परतला आहे. ‘किंग खान’ 2018 मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होते. यानंतर त्यांच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटाचं शूटींग सुरू झालंय. त्यामुळे त्यांच्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरचं या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सोमवारी मुंबईतील एका प्रॉडक्शन हाऊसच्या स्टुडिओ बाहेर शाहरुख खानला हटके लुकमध्ये पाहण्यात आले. पांढरा टी-शर्ट, काळी पॅन्ट, आणि वाढलेले केस यामध्ये शाहरुख अंदाज ‘किंग’ सारखा दिसत होता. ‘पठाण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत. या सिनेमामध्ये दिपीका पादुकोन आणि शाहरुख पुन्हा एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपटामध्ये अॅक्शन असणार आहेत. दिपिका देखील यामध्ये अॅक्शन सीन करणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफ कॅमिओ करणार आहेत.
कोरोनाचा वाढता प्राधुर्भाव बघता या चित्रपटाचे शूटिंग मुंबईमध्ये होणार आहे. यासाठी मुंबईमध्ये स्टुडिओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये जॉन इब्राहिम व्हिलनच्या भूमिकेत असल्याची माहीती मिळत आहे. 2021 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.