पुण्यातील दुकाने उघडणार शुक्रवारी

3

राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला नाही तर सोमवारपासून नियमित दुकाने उघडण्यात येणार असल्याचा इशाराही पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे.

आज पुणे व्यापारी वर्गाच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली. त्यात उग्र भावना व्यक्त करण्यात आल्या. या बैठकीत दोन दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेेेेेतला आहे. यात गुरुवारी(दि. ७) विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलक सोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदविणार आहे. 

दंडावर काळी फित लावून निषेध नोंदविणार आहे. तसेच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडे आठ वाजता दुुकाने उघडतील आणि सायंकाळी ६ वाजता बंद करतील. यावेळी पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी अशा शब्दात रांका यांनी खुले आव्हान दिले आहे.