कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एजदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र यंदा पुणे- मुंबई नाही तर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे विदर्भातील अमरावती. अमरावतीत रुग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात अचानक भलीमोठी वाढ आढळून आली. परिणामी जिल्हा प्रशासन एक्शनमध्ये आले असून तेथे कडक लोकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र यादरम्यानच अमरावतीत कोरोना रॅकेट सक्रीय झाले आहे का? चाचणी निगेटिव्ह आली असतांनासुद्धा पॉझीटीव्ह दाखवून विम्याचे पैसे लाटण्याचा प्रकार घडतो आहे का? अशी कुचबुच अमरावतीकरांमध्ये आणि एकंदरीतच संपूर्ण राज्यभरात होती. परंतू जिल्हा प्रशासनाने त्यावर निर्णय दिला आहे.
अमरावतीत चाचणी पॉझीटीव्ह हवी की निगेटिव्ह. तसेच रीपोर्ट निगेटिव्ह आली असतांनासुद्धा पॉझीटीव्ह करुन विम्याचे पैसे लाटण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरु आहे. असा दाव जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी आमसभेत केला होता. यावर जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी अमोल येडगे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तसेच प्रकाश साबळे यांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र चौकशीअंती यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी याप्रकरणी चौकशी करत दीडशेहून अधिक जणांशी संपर्क साधला. रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांनी विविध प्रश्नांची विचारणा केली. परंतू यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगीतले.
प्रकाश साबळे यांनी अद्यापर्यंत कुठलेही पुरावे सादर केलेले नाही. परंतू यामध्ये अॅंटीबॉडी टेस्ट महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचेकडे संबंद्धित अहवाल पाठवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतील याकडे अमरावतीकरांचे आणि एकंदरीतच महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.