राज्यात कोरोना रुग्णांची सख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. मृत्यूमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
अजित पवारांच्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.अजित पवार आपण रोज उठून लॉकडाउनची धमकी देता पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे, पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील, लॉकडाउन हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही,” असे टि्वट करीत राणेंनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.
राज्यात संचारबंदी लागू असतानाही लोक नियम पाळत नाही,’ असे अजित पवार म्हणाले. गेल्या वर्षीसाराखाच कडक लॉकडाउन लावावा, असे सहकारी सांगत असल्याचे पवार यांनी सांगितले होते.