तृणमूल काँग्रेसला रामराम केलेल्या शुभेंदू अधिकारी यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

30

ममता बॅनर्जी यांच्यानंतर टीएमसीमध्ये एक बडे आणि लोकांवर पकड असणारे नेते म्हणून शुभेंदु अधिकारी यांचे नाव घेतले जात होते.शुक्रवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे.

मंत्रिमंडळात स्थान असलेल्या अधिकारी यांनी दोन आठवड्यांपूर्वी सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या आणि त्या चर्चा खऱ्या असल्याचे आता स्पष्ठ झाले आहे.

शुभेंदू अधिकारी हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज होते. त्यांची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र टीएमसीला यात यश आले नाही. अखेर त्यांनी सर्व पदांचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.यामुळे याच वर्षी 294 जागांसाठी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची ताकड वाढली आहे.