सिद्धार्थ चांदेकर छोट्या पडद्यावर करणार पुन्हा कमबॅक

2

स्टार प्रवाह वहिनी नवी हटके मालिका घेऊन लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या नव्या मालिकेचे नाव ‘सांग तु आहेस का’ असे असून सध्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना उत्साही केले आहे. या मालिकेमुळे एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही प्रकारांचा मेळ पाहायला मिळणार आहे.

ही मालिका 7 डिसेंम्बर पासून रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच वेगळेपण सांगत असताना स्टार प्रवाहाचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवडे म्हणाले, “एखादी गोष्ट रसिकांना खिळवून ठेवते आणि त्याची उत्कंठा वाढवते असं ऐकलं की ती गोष्ट सांगायला अजून हुरूप येतो. सांग तु आहेस का ही मालिका अशीच आहे. या मालिकेचं कथानक अनेक प्रश्न पडत पडत पूढे सरकणार आहे. रहस्य आणि लव्हस्टोरी असे मालिकेचे मूळ असल्याने पुढे काय घडेल याची हुरहूर मनाला नेहमी लागून राहील.