नाशिक शहरात उद्यापासून कडक लॉकडाऊन होण्याची चिन्हे

36

नाशिकमध्ये शहरात गेल्या महिन्यात सरासरी ३,९४७ रुग्णसंख्या होती. दहा लाख लोकांमागे हे प्रमाण १,८५९ होते. सध्याचा हा वेग अधिक असुन गेल्या महिन्यात ९७,७६५ रुग्ण दाखल झाले आहेत. 

रुग्णसंख्या वाढीचा वेग खाली येण्याची कोणतिही लक्षणे सध्या नाहीत. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरात अधिक कडक व संपुर्ण लॉकडाउन होण्याची चिन्हे आहे.

लोकसंख्येच्या तुलनेतच आता नाशिक हे पहिल्या स्थानावर तर नागपूर दुसरे, पुणे तिसरे व मुंबई चौथ्या स्थानावर आहे. देशातील कोरोना प्रसार झालेल्या दहा आघाडीच्या शहरांत ही चार शहरे आहेत.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज विविध यंत्रणांशी चर्चा केली. आज सायंकाळी यासंदर्भात कोरोनाची आढावा बैठक होणार आहे. त्यात कडक लॉकडाउन जाहीर होण्याची शक्यता आहे.