केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांतील आकड्यामुळे दिलासादायक चित्र दिसत आहे.देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे आकडेवारीतून दिसत आहेत.
कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील जागतिक विक्रमांची दुर्दैवी नोंद भारतात झाली. फेब्रुवारीपासून देशातील परिस्थिती भयावह होण्यास सुरूवात झाली. मार्च आणि एप्रिलमध्ये मृत्यूचे तांडवच बघायला मिळाले. दरम्यान या भयावह परिस्थिती हळहळू कमी होत आहे.
तसेच कोरोना रुग्णवाढीबरोबरच देशातील मृतांची वाढत्या संख्येने काळजी वाढवली होती. दुसऱ्या लाटेने देशात मोठं थैमान घालते होते. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्येचा विस्फोट झाला.