राज्यात लवकरच कौशल्य विद्यापीठ पाहायला मिळणार : ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय

27

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन आणि कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आलीय. 

राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून, विधेयकास विधिमंडळात मांडण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे राज्यात लवकरच कौशल्य विद्यापीठ पाहायला मिळू शकते.

पर्यटन धोरण 2016 मधील तरतुदीनुसार आणि कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटक खासगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देतायत.

सध्या भारतामध्ये आठ कौशल्य विद्यापीठांची स्थापना झालीय. त्यामधील सार्वजनिक कौशल्य विद्यापीठे राजस्थान, हरियाणा येथे प्रत्येकी एक याप्रमाणे स्थापन झालीत. आंध्र प्रदेशमध्ये दोन सार्वजनिक कौशल्य विद्यापीठे प्रस्तावित आहेत. राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिसा, महाराष्ट्र येथे प्रत्येकी एक खासगी विद्यापीठाची स्थापना झालीय. 

कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे दोन भाग या धोरणात असून, यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ सहजपणे पर्यटकांना घेता येईल. तसेच रोजगार देखील वाढेल. मुद्रांक शुल्कामध्ये सूट, राज्य वस्तु व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सूट इत्यादी प्रोत्साहने कॅरॅव्हॅन पार्क / कॅरॅव्हॅन पर्यटनाकरीता लागू राहतील.