छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्या भटनागर यांचं कोरोनामुळे निधन

13

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर यांचं आज मुंबईत निधन झालं आहे. दिव्या भटनागर या 34 वर्षाच्या होत्या. 2020 मध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांचे निधन झाले आहे. रविवारी ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. यातच हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्धी अभिनेत्रीचं निधन झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांनतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे दिव्या यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होती. 26 नोव्हेंबरला दिव्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत खराब झाल्यावर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. मध्यरात्री ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्टार प्लस वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ‘गुलाबो’ची भूमिका तिने साकारली होती. या भूमिकेने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली होती. दिव्याची मैत्रिण, अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यने इन्स्टाग्रामवर एक मेसेज लिहून दुःख व्यक्त केले आहे. तीच्या आत्माला शांती लाभो ‘.दिव्याने यापूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते, “हाय माय इंस्टाग्राम फॅमिली. माझ्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करा. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.” दिव्याच्या मृत्यूमुळे तिच्या घरातील आणि सिनेसृष्टीतील व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे.