…तर ठरलं ! आता आठवलेंचा रिपाई पक्ष ‘या’ राज्यात निवडणुका लढवणार

44

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. बिजेपी,काँग्रेस, इत्यादी पक्ष कामाला लागले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष सुद्धा पश्चिम बंगालमध्ये 10 जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

पश्चिम बंगाल मध्ये भाजप प्रणित एनडीए आघाडी ला आरपीआयचे समार्थन राहील. भाजप सोबत आरपीआय ची युती राहणार असून पश्चिम बंगाल मध्ये भाजप आरपीआय एनडीएचा मोठा विजय होईल तर तृणमूल काँग्रेस चा दारुण पराभव होईल असा विश्वास रामदास आठवले यांना आहे. पश्चिम बंगाल रिपाइंचा मेळावा कोलकाता येथे घेण्यात आला यावेळी रामदास आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं चे पश्चिम बंगालचे प्रदेश अध्यक्ष मृत्युंजय मलिक उपस्थित होते. पश्चिम बंगाल च्या आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांच्या तृणमूल काँग्रेस चे पानिपत होणार असून एनडीएचा प्रचंड मोठा विजय होईल असे रामदास आठवले म्हणाले.