भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. धनंजय मुंडेंचे नाव न घेता निलेश राणेंनी मुंडेंना लक्ष्य केलं. प्रॉपर्टी लपवणारे बायका लपवणारे सुसंस्कृत का, असा टोला निलेश राणेंनी धनंजय मुंडेंना लगावलाय.
अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले, त्या माणसाबद्दल बोलायला नको, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. त्यांनी रत्नागिरीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी अजित पवारांवर त्यांनी घणाघाती टीका केलीय
फणडवीस शपथविधीच्या पहाटे काय घडलं ते अजून सांगत नाहीयेत, जर सांगितलं तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाही, असं सांगत निलेश राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
सुप्रीम कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंचे नाव घेतले, मग आम्ही काय बोलायचे नाही, तुम्ही खून करा, तुम्ही नाईट किंग आहात ना मग रात्री मर्डर करा, यांना काय लायन्सस आहे का?, सुशांत सिंग प्रकरणातले सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही कुठे गेले, असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केलाय.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यावर माजी खासदार निलेश राणेंनी तोंडसुख घेतलंय. सिंधुदुर्गातील प्रजासत्ताक दिनाच्या आंदोलकांना भेटीला न जाता दिल्लीतल्या शेतकरी आंदोलकांना भेटल्यावरून निलेश राणेंनी विनायक राऊत यांनी चिमटे काढले.
आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो, त्याच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार साहेबांसोबत उभं केलं जाते, तोच माणूस भाजपावर टीका करतो आणि आपण सहन करायची का, असा सवाल उपस्थित करत माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.