तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन : दत्तात्रय भरणे

125

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाणी घेऊन गेल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर पाणी पळवल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केलाय.

त्यावर उजनी धरणातील सोलापूर शहर जिल्ह्याचे नियोजित एक थेंब पण पाणी पालकमंत्री म्हणून घेतले असल्याचं सिद्ध केल्यास मी मंत्रीपद नव्हे तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे.

काळे कपडे परिधान करून येणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाला प्रवेशद्वारावर पोलिसांनी रोखले. सोलापूर जिल्ह्याचे 900 रेमडेसिव्हीर इजेंक्शन इंदापूरला पालकमत्र्यंनी नेल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. यावेळी भाजप नगरसेवकांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेधही केला. 

भाजपा नगरसेवक सुरेश पाटलांना पोलिसांनी त्यांतर ताब्यात घेतलं. सोलापूरचं पाणी पळवल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी निषेध व्यक्त केला.