परभणी जिल्ह्यात ‘इतके’ व्यक्ती कोरोना बाधित; तर 821 कोरोंनामुक्त, 11 रुग्णांचा मृत्यू

4

परभणी जिल्ह्यात काल गुरुवारी 478 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 821 व्यक्तीं कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

रुग्णालयातील कक्षात 4 हजार 349 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 1086 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 44 हजार 894 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 39 हजार 459 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

रुग्णालयातर्फे आतापर्यंत 2 लाख 71 हजार 433 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 26 हजार 415 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 43 हजार 803 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 1075 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.