गॅस सिलेंडरच्या किंमतीत ‘इतकी’ वाढ

24

नागरिकांना कायमच इंधन दरवाढीचा फटका बसत असतो. दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत आहे. इंधन दरवाढीचा कहर गृहिणींसाठी चिंतेचा विषय आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर नियंत्रण सरकारने ठेवायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही.

देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चालले आहेत. दरवाढ थांबवण्यासाठी सरकार आपयशी ठरले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असल्यानेही दरवाढ लवकर नियंत्रणात येण्याची शक्यता नाही. पेट्रोलचे दर सध्या प्रतिलिटर नव्वदीपार गेले आहेत, तर डिझेलने 80 रुपयांचा आकडा ओलांडला आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या मागील १५ दिवसांमध्ये केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केलीय. १४.२ किलोचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवल्या आहेत. तर पाच किलोच्या गॅसच्या किंमती १८ रुपयांनी वाढवल्या आहेत. १९ किलो सिलिंडरसाठी आता ३६.५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.