म्हणून आमचा राग दगाबाज शिवसेनेवर आहे: चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

7

अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वादावर स्वत: पाटील यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. आमचा रागा अजित दादांवर नसून दगा देणाऱ्या शिवसेनेवर असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटल आहे.

माझा आणि देवेंद्रजींचा राग सरकार पडलं म्हणून अजित पवारांवर नाही. शिवसेनेनं दगा दिल्यामुळे शिवसेनेवर आहे, असही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. अजित दादा आणि चंद्रकांत दादा यात मोठे दादा कोण हे समाज ठरवेल, असंही ते म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना ‘नाथाभाऊ आमचे नेते, त्यांनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं’ अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

प्रत्येकाला प्रेस समोर येण्याची घाई झाली आहे असे म्हणत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही अशी टीकाही केली.