रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. आता, बाबा रामदेव यांनी अभिनेता आमीर खानलाही या वादात ओढून घेतलं आहे. त्यामुळे, हा वाद आणखीनच चर्चेचा विषय बनला आहे.
ऍलोपॅथी आणि ऍलोपॅथिक डॉक्टरांवर आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने योगगुरू आणि व्यावसायिक रामदेवबाबा यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आमीर खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच रामदेव यांनी दिले आहे.
वास्तविक किंमतींच्या 50 पट अधिक दराने ही औषधे विकली जात असल्याचा आरोप या व्हिडिओत केला आहे. या व्हिडियोवरून त्यांनी मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच दिल आहे.