मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपबद्दल जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून भाजपची पिछेहाट सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या ऐतिहासिक विजय हा भाजपला मोठा चपराक देणारा आहे. एक हाती निवडणूक जिंकणाऱ्या ममता बॅनर्जी यांचे आपण अभिनंदन करत असून इतर राज्यांमध्ये ही भाजपला रोखले जात आहे.
देशात कोरोनाचे मोठे संकट आले आहे. यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना केली असती तर या संकटावर मात करता आली असती, असं थोरात यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारने निवडणुकांच्या राजकारणा ऐवजी जनतेच्या विकासाचे राजकारण करत कोरोना संकटात नागरिकांना औषधोपचार, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करून आर्थिक मदत करावी अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.