म्हणून ‘या’ भाजप नेत्याच्या पत्नीने घेतला श्रद्धेय दीदींबरोबर काम करण्याचा निर्णय

10

भारतीय जनता पक्षाचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता खान यांनी आज तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.मला आत्मसन्मान हवा आहे आणि मला मोकळा श्‍वास घ्यायचा आहे त्यामुळे मी आता श्रद्धेय दीदींबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुजाता यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सौमित्र खान आणि सुजाता यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पडद्यामागे सुरू असलेली लढाई आता पुढे आली असल्याचेही बोलले जात आहे.सौमित्र खान यांना लोकसभेवर निवडून आणण्याचे सारे श्रेय त्यांच्या पत्नी सुजाता यांच्याकडेच जाते. त्यामुळे त्यांच्या तृणमूल कॉंग्रेसमधील प्रवेशाला विशेष महत्त्व दिले जात आहे. 

सुजाता मंडल यांनी टीएमसीत प्रवेश केल्याने पती भाजपा खासदार सौमित्र खान नाराज झाले आहेत. त्यांनी पत्नी सुजाता मंडल यांना घटस्फोटाची नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे.