त्यामुळे पडळकरांकडे लक्ष देण्याची गरज नाही : हसन मुश्रीफ

7

आरक्षणप्रश्नी परवा बैठक झाली. यावेळी आता पुन्हा आयोग नेमून, जनगणना करुन ओबीसी आणि मराठा समाजला आरक्षण देण्यासाठी महाविकास आघडी सरकार कटिबद्ध आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

शरद पवार साहेबांची बदनामी करण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकरांना विधानपरिषदेची आमदारकी देऊन केलेली एक चाल आहे. त्यामुळे पडळकरांकडे लक्ष देण्याची गरज नाही”, असं ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ म्हणाले.

तसेच हसन मुश्रीफांनी पडळकरांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं. तसंच शरद पवारांची बदनामी करण्यासाठी भाजपने पडळकरांना आमदारकी दिल्याचं मुश्रीफ म्हणाले.

त्यावेळी आम्ही जास्त वकील ठेवले. मात्र 102 वी घटना दुरुस्ती झाली, त्यात शरद पवारांचा संबंध कुठून आला, असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी विचारला.