म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हीदेखील सर्वांच्या पाठीशी देवासारखे राहा : उद्धव ठाकरे

34

आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता प्रधानमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 

देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडेसिवीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच प्रधानमंत्र्यांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती.