कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी याआधीच कार्यक्रमांच्या आयोजनाची तयारी झाली आहे.
बाईक रॅली, पोवाडे, इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे, राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या प्रमाणात पार पडला. यावेळी काँग्रेसने मुंबईत शक्तिप्रदर्शन देखील केले.
शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवला पाहिजे याबाबत शंका नाही, मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. विविध पक्षांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळते मग शिवजयंतीलाच नियम व अटी का ?’ असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शिवभक्तांच्या रोषानंतर शिवजयंतीच्या कार्यक्रमाला १० लोकांची उपस्थित असावी असा निर्णय नजरचुकीने झाल्याचं सांगत राज्य शासनाने १०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे.