नितीन गडकरी यांच्या या घोषणेनुसार ग्राहकाने जुनी कार स्क्रॅप केल्यास वाहन कंपनीकडून संबंधित ग्राहकाला कार खरेदीवेळी पाच टक्क्यांची सूट मिळेल.
रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठीचे शुल्क तिप्पट करण्यात आले आहे. त्यामुळे जुनी वाहनं वापरत असलेल्या वाहनधारकांना नवीन वाहन घेणं अधिक सोयीस्कर वाटेल. परिणामी रस्त्यांवर नवी वाहने धावतील.
संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, मोटार कंपन्यांची अशी मागणी आहे की, नवीन पॉलिसी काही दिवसांसाठी पुढे ढकलावी, जेणेकरुन आगामी फेस्टिव्ह सीजनमध्ये होणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर त्याचा परिणाम होणार नाही
सरकार खासगी भागीदारांना आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी मदत करेल. सेल्फ ड्राईव्ह टेस्टमध्ये फेल ठरणाऱ्या वाहनांकडून दंड आकारला जाईल.
केंद्र सरकारने जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी आखलेल्या व्हेईकल स्क्रॅप्रिंग धोरणामुळे ग्राहकांना एक मोठा फायदा होणार आहे. या धोरणानुसार तुम्ही तुमची जुनी गाडी भंगारात देऊन नवी गाडी खरेदी केली तर तुम्हाला नव्या कारच्या खरेदीवर 5 टक्के सूट मिळेल.
त्यामुळे जुन्या गाड्या असलेल्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.केंद्रीय भूपृष्ठ आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.