समाजमाध्यमांनी कोरोनामुळे मुत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करू नये : खासदार बाळू धानोरकर

41

मृताची ओळख जाहीर केल्याने त्यांच्या कुटुंबांतील व्यक्तींना व परिसरातील नागरिकांना मनस्ताप होत असतो. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करणे टाळले पाहिजे. वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, बेव पोर्टल व समाजमाध्यमांत मुत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करण्यात येते. ती सार्वजनिक करू नये, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिली आहे.

वाढत्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता संपूर्ण केंद्र पूर्ण क्षमतेने १० दिवसांत कार्यान्वित करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या.धानोरकर यांनी समाजकल्याण विभागाचे मुलीचे व मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली. यामध्ये २ जनरेटर, ५ व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, रुग्णवाहिका ठेवण्याच्या त्यांनी सूचना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

यावेळी उपविभागीय अधिकारी ढवळे, तहसीलदार राईंचवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम, मुख्याधिकारी नगर परिषद सरनाईक, काँग्रेस नेते घनशाम मुलचंदानी, करीमभाई, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्या, जयफराज बजगोती, डॉ. भसारकर, इस्मानभाई, मो. फारूक यांची उपस्थिती होती.