(लासूर प्रतिनिधी) : संजय शर्मा
गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते तथा समाजभूषण श्री नवल चंद कोठारी नेहमीच समाजसेवेत सक्रीय असतात विशेष करून कोरोना महा मारीत महाराष्ट्र एसटी मंडळाला विशेष सहकार्य केले .
औरंगाबाद ते लासुर स्टेशन गेल्या वीस वर्षांपूर्वी बस सेवा सुरू होती मध्यंतरी काळात ही सेवा बंद झाली त्यामुळे लासुर स्टेशन येथील अनेक कामगार एमआयडीसी वाळूज औरंगाबाद येथे जायचे त्यांची खूप गैरसोय म्हणून श्री नवल चंद कोठारी यांनी सतत पाठपुरावा करून प्रदीर्घ कालावधीनंतर या मार्गावरील बससेवा पूर्ववत करून घेतले त्यामुळे लासुर स्टेशन ते मुंबई नागपूर हायवे रांजणगाव मार्गे औरंगाबाद जाण्याची उत्तम सोय झाली यामुळे प्रवासी खूप आनंदित आहेत आणि नवल चंद कोठारी यांचे धन्यवाद व आभार मानतात.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ औरंगाबाद विभागाच्यावतीने विभाग नियंत्रक श्री अरुणजी सिया साहेब यांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन प्रशासकीय सन्मान करण्यात आले. लासुर स्टेशन येथील बस स्थानक कंट्रोलर श्री अनिल झांबरे साहेब यांनी ही माहिती दिली.