काही जण सुपात तर काही जण जात्यात : चंद्रकांत पाटील

9

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. परब यांनी देखील मुंबई महापालिकेच्या नावाचा वापर करून अनेकांना धमकावत पैसे घेतल्याचे वाझेने सांगितले आहे. त्यांचीही चौकशी झालीच पाहिजे असेही पाटील यावेळी म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ” काही जण सुपात तर काही जण जात्यात असल्याची प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

अनिल देशमुखांच्या घरावरील सीबीआयचा छापा ही कायदेशीर बाब आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे. तसेच सिंह यांच्या आरोपांवरुन अनिल देखमुखांविरोधात सीबीआय चौकशी केली जाते तर वाझेने ऑन पेपर अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत.असेही पाटील म्हणाले.