गरजूंच्या मदतीसाठी सोनू सूद झाला स्वतः कर्जबाजारी

10

लॉकडाऊनमुळे दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे बेरोजगार झालेल्या नागरिकांनी पायी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.या दरम्यान अभिनेता सोनू सूदने लोकांना आपल्या गावी पोहचवण्यापासून त्यांना नोकरी किंवा रोजगार मिळवून देण्यासाठी मोलाची मदत केली

त्यातच आता आणखी एक पाऊल पुढे जात त्याने गरजूंची मदत करण्यासाठी आपल्या स्वतःच्या आठ मालमत्ता गहाण ठेवत, 10 कोटी रुपयांचे त्याने कर्ज घेतले आहे. 48 वर्षीय सोनू सूद आणि त्याची पत्नी सोनाली यांच्या नावावर या सर्व मालमत्ता आहेत. यामध्ये दोन दुकाने आणि सहा अपार्टमेंट यांचा समावेश आहे.15 सप्टेंबर रोजी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेबरोबर सोनू सूदने करार केला आणि 24 नोव्हेंबर रोजी कर्जाची नोंद झाली. सोनू सूदने 10 कोटी कर्जासाठी नोंदणी फी म्हणून 5 लाख रुपये दिले आहेत.

रोजगार नसल्यामुळे अनेकांनी आपल्या गावचा रस्ता धरला होता. यात परराज्यातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अभिनेता सोनू सुद या लोकांच्या मदतीसाठी देवदूत बनून धावून आला.मनीकंट्रोलकडे उपलब्ध असलेल्या नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, सोनूने जुहू येथील शिव सागर सीजीएचएस मधील तळ मजल्यावरील दोन दुकाने आणि सहा फ्लॅट गहाण ठेवले आहेत. ही इमारत मुंबईतील इस्कॉन मंदिराजवळ एबी नायर रोडलगत आहे.