सोनू सूदच्या बांधकामावर नुकताच मुंबई महापालिकेकडून आक्षेप घेण्यात आलाय. आज मुंबईत अभिनेता सोनू सूद याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज झालेली भेट ही सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी झाली असं सोनुने म्हटलंय.
सध्या मुंबई महापालिका आणि सोनू सूद यांच्यात अनधिकृत हॉटेल वरून वाद सुरु आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात याची सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने या प्रकरणी १३ जानेवारी म्हणजे आजपर्यंत स्थगिती कारवाईस स्थगिती दिली आहे.
सोनुविरोधात BMC कडून नोंदवण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे की, मुंबईतील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डिंग मुंबई महापालिकेला न माहिती देता हॉटेलमध्ये रूपांतरित केली. शक्ती सागर ही एक निवासी इमारत असून त्याचा कमर्शियल वापर करता येऊ शकत नाही. महाराष्ट्र रिजन अँड टाऊन प्लॅनिंग ऍक्ट कलम ७ अंतर्गत हा दंडनीय गुन्हा असल्याचंही BMC चं म्हणणं आहे. इमारतीच्या मुळ आराखड्यात बदल करणे, इमारतीचा काही भाग वाढवणे आणि त्याचा वापर करण्याचे आरोप सोनू सुदवर केले आहेत.
आज शरद पवार यांची सोनुने घेतलेली भेट वेगळं काहीतरी सूचित करत असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतायत. सोनू ने शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली.अद्याप या भेटीमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीमुळे सर्वत्र चर्चेचा सूर उमटत आहे.