सौरव गांगुलीची प्रकृती बिघडल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल

13

बीसीसीआय’चे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांची तब्येत मंगळवारी रात्री पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांना पुन्हा एकदा ओपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना बुधवारी छातीत वेदना होण्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच ३ जानेवारीला सकाळी जिममध्ये व्यायाम करताना गांगुलीने छातीत दुखू लागल्याची तक्रार केली होती.

याआधी, याच महिन्यात हृदयविकाराच्या सौम्य झटक्यामुळे गांगुलींना दक्षिण कोलकात्यातील वूडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते घरीही गेले होते. मात्र, याच महिन्यात गांगुलींवर पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली.

रुग्णालय प्रशासनाने एक प्रेस रिलीज जारी केली असून त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की, “सौरव गांगुली आपल्या हृदयाच्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात आले होते. गेल्यावेळी ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बरे होऊन घरी परतले होते. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा असून त्यांना कोणताही त्रास होत नाही.”

गांगुलीला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे, हे समजताच त्याच्या तब्येतीसाठी क्रिकेट विश्वातून प्रार्थना सुरु झाली आहे. गांगुलीला वुडलँड्स हॉस्पिटलमधून 7 जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर तीन आठवड्याच्या आतच गांगुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.