नविन कृषी कायद्यांविरोधातील दिल्ली सिमेवरील आंदोलन अधिक तीव्र होते आहे. यातच आंतरराष्ट्रीय सेलीब्रिटी तसेच काही जगविख्यात व्यक्तींकडून या आंदोलनावर प्रतिक्रिया येत असून भारताच्या जागतिक अस्मितेवर प्रश्नचिन्ह ऊभा राहत असल्याचे बोलले जात आहे. अशांतच भारतातील खेळाडूंनी आणि कलाकारांनी यास प्रत्युत्तर दिले आहे. या प्रत्यत्तर देण्यावरुन आता राजकारण तापते आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांना प्रत्युत्तर देणार्यांना कॉंग्रेसचे नेते शशी थरुर आणि पी. चिदंबरम यांनी खडे बोल सुनावले आहेत. तसेच परराष्ट्र मंत्रालयावरदेखील सवाल ऊपस्थित केले आहे.
जगभरातून ऊमटणार्या प्रतिक्रियांवर “हा भारताचा अंतर्गत विषय आहे’ असे म्हणत भारतातील काही कलाकार आणि क्रिकेटपटूंनी प्रत्युत्तर दिले आहे. यादरम्यान #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या दोन हॅशटॅगचाही वापर करण्यात आला. यानंतर #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही वापरण्यात आले होते. सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, विराट कोहली, रवी शास्त्री यांनीदेखील हे हॅशटॅग वापरून ट्विट करत सरकारला पाठिंबा दिला.
परराष्ट्र मंत्रालयानेदेखील यात ऊडी घेत या आंदोलनाबद्दल घाईघाईत प्रतिक्रिया देण्याआधी हा विषय समजून घेणं आवश्यक आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे म्हटलं होतं. तसंच यासोबत #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही वापरण्यात आले होते.
‘
भारत सरकारसाठी प्रसिद्ध भारतीय मंडळींनी पाश्चिमात्यांवर पलटवार करणं लाजिरवाणं आहे. भारत सरकारची अडीग वृत्ती आणि लोकशाहीविरोधी वर्तनामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला जे नुकसान झालंय त्याची भरपाई क्रिकेटर्सच्या ट्विटमुळे होऊ शकत नाही’ असे शशी थरूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. शेतकरी आंदोलन ही भारताची अंतर्गत बाब आहे, असं म्हणणाऱ्यांना त्यांनी टोला लगावलाय तसेच परराष्ट्र मंत्रालयासमोर काही प्रश्न ऊलस्थित केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून म्यानमारमधील सत्तापालटावर भाष्य का करण्यात आलं होतं? परराष्ट्र मंत्रालयाला याची चिंता का वाटली? श्रीलंका आणि नेपाळच्या ‘अंतर्गत’ बाबींवर वेळोवेळी प्रतिक्रिया का व्यक्त केली जाते? अमेरिकेतील संसद भवनावर झालेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रतिक्रिया का व्यक्त केली?’ असे त्यांनी म्हटले आहे. सोबतच ‘एस जयशंकर यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीनं परराष्ट्र मंत्रालयाला अशा बालिश प्रतिक्रिया देण्यापासून परावृत्त करायला हवं’ असा सल्लाही पी चिदंबरम यांनी यावेळी दिला.