अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘डूम्सडे मॅन’ म्हणत हेटाळणी केली.या टिप्पणीवरून टी. एन. प्रतापन यांनी लोकसभा अध्यक्ष कार्यालयाकडे विशेषाधिकार हनन नोटीस दिली आहे.
देशाला तोडणाऱया ताकदींसोबत उभे राहतात आणि संविधानिक संस्थांचा अपमान करतात’ असा आरोप यावेळी निर्मला सीतारामन यांनी केला होता.
अर्थमंत्री कोणत्या आधारावर या पद्धतीचे आरोप करत आहेत? असा प्रश्न प्रतापन यांनी नोटिसीद्वारे विचारला आहे.