सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा तुटवडा राज्यात निर्माण झाला आहे. रुग्णांना मोठ्या संकटाला सामोरे जावं लागत आहे.
त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मात्र, सामान्य नागरिकांना रेमडेसिविर इंजेक्शन कसे मिळवायचे हा प्रश्न भेडसावत आहे.
दरम्यान, तुमच्यात हिंमत असेल तर, न रडता 50 हजार रेमडेसिव्हीर जनतेसाठी स्वत:च्या ताकदीवर आणून दाखवा, नाहीतर स्वत:ला मर्द म्हणणं तरी बंद करा, अशी खोचक टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे.
“स्वतः करायचे नाही… आणि दुसरे करत असतील, तर करु द्यायचे नाही.. तुमच्यात हिंमत असेल तर, न रडता ५० हजार रेमडीसीवीर जनतेसाठी स्वतःच्या ताकदीवर आणून दाखवा ! नाहीतर स्वतःला मर्द म्हणणे, तरी बंद करा! स्व.बाळासाहेबांच्याच शब्दात बोलायचं, तर हे ‘येडझवं सरकार आहे’ !” अशी जहरी टीका नितेश राणे यांनी ट्विट करत केली आहे.