अनुराधा अंजली दशरथ विपट
युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने २६ मार्च १६६१ मध्ये जागतिक रंगभूमी दिनाची सुरवात केली.दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. नाटकातील पहिली, दुसरी, तिसरी घंटा वाजल्यानंतर नाटकाचा पडदा उघडतो.अभिनयाचे शिक्षण नाटकातूनच पूर्ण होते. शिस्त लागण्याबरोबरच भूमिकेचा कसा अभ्यास करावा, याची कल्पना नाटकातून होते. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता.
रंगभूमीच्या इतिहासापासून ते आजची रंगभूमी, मराठी नाटककारांनी लिहिलेली नाटके, त्यांच्या मर्यादा, प्रेक्षकांची मनोभूमिका या मुद्द्यांवर सविस्तर विवेचन करणे काळाजी गरज आहे.आजच्या काळात टीव्ही माध्यम महत्त्वाचे असले तरी रंगभूमीकडून मालिका, चित्रपटांत काम करणारे अभिनेते अभिजित खांडकेकर, अनिता दाते, नेहा जोशी अधिक प्रगल्भ झालेले मराठी इंडस्ट्रीत बघायला मिळतात.बारामतीतील तरुण कलाकारांमध्ये उत्साह दिसत असून, ते चांगले काम करताना दिसत आहे. जे कलाकार रंगभूमीकडून टीव्ही अभिनयाकडे वळतात त्यांना अडचणींचा सामना करावा लागत नसल्याने ते ‘लंबी रेस के घोडे’ म्हणून समोर येतात.मराठी रंगभूमी खऱ्या अर्थाने बदलली ती विजय तेंडुलकरांच्या काळापासून.
सद्यस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होऊन लेखक-कलावंत एकाकी पडले आहेत. कलावंत, विचारवंत, लेखक यांना बोलण्याची मुभा राहिली नाही. शासकीय व्यवस्थेने लेखक व कलावंतांचा सन्मान राखण्याची गरज आहे. आवड म्हणून कमी फेम म्हणून जास्त तरुण मंडळी येत असल्यामुळे त्यांना क्वचितच संधी मिळते. नाटकातूनच रंगमंचावरील मूलभूत गोष्टी, कौशल्य, व्यावहारिकतेचे ज्ञान मिळते. आताच्या परिस्थितीत तरुणांना अभिनयात कारकीर्द करायची असेल, तर तरुण मंडळींनी अभिनयाचा पाया म्हणून नाटकांत काम केल्यास अधिक संधी प्राप्त होत असल्याचे दिसते.मराठी रंगभूमीला सशक्त करण्यासाठी लहान वयापासूनच रंगभूमीची माहिती व आकर्षण निर्माण होणे गरजेचे आहे.
प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, प्रबोधनातून समाजाला दिशा दाखविणारे, समाजावर भाष्य करणारे अशा विविध पैलूंनी नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन होते.आताची तरुणाई सोशल मीडियात गुंतली आहे. त्यातून तिला बाहेर काढून रंगभूमीकडे वळविण्याची गरज जागतिक रंगभूमीदिनी व्यक्त होत आहे.व्यावसायिक प्रयत्नांची नाट्य वर्तुळात चर्चा असूनही रंगकर्मी-रसिकांची अनास्था नवोदितांची निराशा करणारी ठरली आहे.टीव्ही चॅनल्सची वाढती संख्या, मोबाइल, इंटरनेट यांनी मनोरंजनाचे अनेक पर्याय खुले केले. विष्णूदास भावे यांच्या काळातील नाटके, ज्येष्ठ नाटककार खाडीलकर, देवल, कोल्हटकर, गडकरी यांनी लिहिलेली नाटके यांचा परीचय आजच्या पिढीला करून दिले पाहिजे. मराठी रंगभूमीचा इतिहास सांगताना १८४३पूर्वी रंगभूमी होती आणि तेव्हापासून व्यावसायिक रंगभूमी कशी अस्तित्वात आली हे लक्षात घेतले पाहिजे.