राष्ट्रीय जनता दलाचे दिग्गज नेता आणि बिहार विधानसभेचे माजी सभापती उदय नारायण चौधरी यांनी नितीश कुमार यांना ऑफर दिली. त्यांनी म्हटलंय की तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवावं आणि 2024 मध्ये नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्यामध्ये राजद त्यांना समर्थन देईल.
नितीश कुमार यांच्यासाठी आता दिल्लीकडे कूच करण्याची वेळ आली आहे. आता त्यांना केंद्राच्या राजकारणात पाऊल ठेवलं पाहिजे. केंद्रात सातत्याने सक्षम विरोधी नेतृत्वाची पोकळी असून नितीश ती पोकळी भरुन काढण्यात सक्षम आहेत.विशेष म्हणजे याआधी नितीश कुमार यांनी स्वतः मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती, मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला असे व्यक्तव्य त्यांनी केले होते. असे उदय नारायण चौधरी यांनी पुढे म्हटल आहे .
बिहारमध्ये भाजपा-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीएच्या सरकारला फक्त दोनच महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अनेकदा या दोन्हीही पक्षात वादाचे मुद्दे समोर आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर राजदने दिलेली ही ऑफर महत्त्वपूर्ण मानली जात आहे.याबाबतचे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे.