सलमान खानच्या ड्रायव्हरसह स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण

1

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात पुन्हा वाढला आहे. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या ड्रायव्हरसोबत दोन स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाल्याने सलमान खानने स्वतःला क्वारंटाईन केले आहे. सलमान खान 14 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.

दम्यान, ‘राधे’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात झाली होती. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री दिशा पटानी स्क्रीन शेअर करणार आहे. सलमान खान सध्या बिगबॉस 14 चे होस्टिंग करत आहेत. या क्वारंटाईनमध्ये ते शोचे होस्टिंग करणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

कोरोनाचा धोका फक्त मनोरंजन क्षेत्रावर नाही तर संपूर्ण देशावर आहे. राज्यात कोरोनाबधित संख्या 17 लाखाच्या वर गेली असून 17 लाख 57 हजारांहून अधिक कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 46 हजार 200 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. अशातच कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.