२२ वर्षाची तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्ये नंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मृत्यूनंतर समाज माध्यामातून व्हायरल अनेक झालेल्या ऑडीओ क्लिप्स वरून वनमंत्री विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते संजय राठोड यांच्यावर वेगवेगळ्या आरोपांच्या फेर्या सुरु झाल्या होत्या. संजय राठोड इतके आरोप होऊनही १२-१३ दिवस माध्यमांसमोर आले नाहीत यावरून भाजप नेते जास्तच आक्रमक झाले होते.
भाजपकडून मंत्री संजय राठोड यांच्यावर जास्तीत जास्त आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला गांभीर्याने घेतल्या आहेत आहेत त्यांच्या वारंवारच्या भूमिकेवरून सोष्ट होत आह.
पूजा चव्हाण प्रकरणात आता चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांवरच चित्रा वाघ यांनी शंशय व्यक्त केला आहे. पुणे पोलिसांच्या अखत्यारीतून आता हि केस कोणातरी विशेष पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग करून निष्पक्ष चौकशी करण्याची वाघ यांनी मागणी केली आहे.