महाविद्यालये सुरु करा अभाविपचे राज्यव्यापी आंदोलन

67

कोरोनामुळे गेल्या मार्च महिन्यापासून महाविद्यालये बंद आहे. अाता कोरोनाचा वेग अोसरतो आहे. तसेच कोरोनावर प्रतिबंधात्मक लससुद्धा आलेली आहे आणि भारतात लसीकरणांसदेखील सुरुवात झाली आहे. अशावेळी महाविद्यालये पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मागणी अभाविपने सातत्याने केली. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमिवरच आज अभाविपतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातदेखील या आंदोलनाचे पडसाद बघायला मिळाले. यावेळी जिल्ह्यातील अभाविप कार्यकर्त्यांनी महिवद्यालयांत निवेदने देऊन सरकारच्या वेळखाऊ धोरणाचा निषेध केला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आहे. विद्यार्थी परिषद वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम राबवत असते तसेच विद्यार्थ्यांच्या समस्याच्या विरोधात आवाजही उठवत असते ज्यामुळे विद्यार्थी परिवारात अभाविप ची ओळख आहे.

राज्य सरकारद्वारे दारुची दुकाने, मॉल, सिनेमागृहे व परिवहन सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच राज्यातील पहिली ते पाचवी व नववि ते बारावी च्या सर्व शाळा सुरु करण्यात आल्या मग महविद्यालयेच का बंद? असा प्रश्न या निवेदनाद्वारे ऊपस्थित करण्यात आला.

महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा उपयोग करण्यात येत आहे. परंतु त्यामुळे शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे महाविद्यालय नियमित सुरु करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वाशिम शाखेने यावेळी केली. यावेळी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत कार्यर्त्यांतर्फे निवेदने देण्यात आली.

निवेदन देते वेळी वाशिम जिल्हा संयोजक यशवंत काळे, वसतिगृह प्रमुख राहुल खरात, प्रसिद्धी प्रमुख श्रीरंग पाठक, अथर्व काटेकर अभाविप कारंजा नगरमंत्री गौरव साखरकर, प्रांत वसतिगृह प्रमुख प्रशांत राठोड, नगर सहमंत्री विकी बारबोले, विद्यार्थिनी प्रमुख स्नेहा लोखंडे इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.