राज्यात १५ दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन करावा, उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना !

99


राज्यात कोरोनाच्या वाढत असलेल्या केसेस आणि नागरिकांनी कोरोनाचे घेतलेले गांभीर्य यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मोठे विधान केले आहे. राज्य सरकारने १५ दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा, अशी सूचना हायकोर्टाने केली आहे तसेच कोरोनाविषयी लोकं अजूनही गंभीर दिसत नाहीत. कोरोनाविषयक नियमांचे पालन केलं जात नाहीये. असे असेल तर कोरोनाला कसे रोखणार असा सवाल सुद्धा हायकोर्टाने उपस्थित केला आहे.


आज राज्यातली परिस्थिती पाहिली तर अजूनही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. लोक अजूनही गंभीर नाहीत. त्यामुळे राज्यात पूर्ण १५ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन केल्याशिवाय परिस्थिती आटोक्यात येणार नाही. राज्य सरकारने पूर्ण 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करावा, अशी सूचना न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडे केली आहे.


राज्य सरकारने ब्रेक द चेन अतंर्गत 1 मे पर्यंत अनेक कठोर निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेले आहेत. या निर्बंधांची मुदत येत्या १ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे राज्यात आणखी १५ दिवस हे निर्बंध वाढवण्यात येतील असे भाष्य राज्य सरकारच्या काही मंत्र्यांनी केले होते. तसेच, काही मंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवावा अशी सूचना सुद्धा केलेली आहे. मात्र, त्याविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत.