राज्य कोरोना संकटात; राज्याचे बडे नेते दिल्लीत संगीत स्नेहभोजनात व्यस्त

33

महाराष्ट्रात सध्या कोरोणाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यातील बडे नेते दिल्लीत संगीत रजनी ऐकण्यात दंग आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज्यात रुग्ण वाढू नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. पण दिल्लीतील महाराष्ट्रीयन नेते स्नेहभोजन आणि संगीत रजनी मध्ये व्यस्त असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

शिवसेनेचे नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या दिल्ली निवास्थानी सुप्रसिध्द गायिका मैथिली ठाकुर यांच्या उपस्थितीत संगीताची मैफिल व स्नेहभोजनाचा कार्यक्रम काल रात्री पार पडला. या मैफिलीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होत्या.

राज्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना, राज्यातील महत्वाचे नेते दिल्लीत गाण्यात आणि खाण्यात व्यस्त असल्याने सामान्यांना कुणी वाली राहिला नसल्याची भावना सामान्य नागरिकांमध्ये आहे. एकीकडे महाराष्ट्र संकटात असताना नेत्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे कितपत योग्य आहे. असा प्रश्न सामान्य जनतेला पडला नाही तर नवल.