मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही: नितेश राणे

5

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी राज्य सरकारला चांगलंच कोंडीत धरले आहे. इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. परंतु मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही असा दावा करत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर आरोप केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी २९ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टिका केली. सत्तांतर झालं. तुम्ही सत्तेत आलात. पण तुम्ही मराठा आरक्षणाच काम का केलं नाही. उलट तुम्ही वकिलाला गायब केलं आहे. राजकारण करून तेवढीच वेळ मारून न्यायची आणि फक्त राजकारण करायचं. शेवटी विचार करणं गरजेचं आहे. यासाठी पुढाकार घेतला पाहिजे .एवढा मोठा प्रश्न आहे. तरीही मराठा समाजाला किरकोळ समजता. मराठा समाजाला विसरून चालणार नाही. जसे इतर जातीतील लोक आहेत. तसेच मराठा ही देखील एक जात आहे. हा महाराष्ट्र आहे. असा टोलाही उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारला लगावला.

‘देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलत तर, तीन महिण्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आमची’ असा दावाही भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. तसेच महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला त्रास देयचा आहे. असा आरोपही त्यांनी सिंधुदुर्ग येथे ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केला आहे