कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या राज्य सरकारने लपवली : देवेंद्र फडणवीस

20

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या राज्यसरकारने लपविल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधी पक्षनेते फडणवीस हे बुधवारी दुपारी परभणी शहराच्या दौ-यावर दाखल झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व अन्य वरिष्ठ अधिका-यांबरोबर चर्चा केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी हितगुज केले. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या सरकारने लपविल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

पहिल्या व दुस-या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण दगावले सरकारचे अपयशच त्या मागे कारणीभुत होते. परंतू सरकारने हे अपयश झाकण्याकरिता मृत्यूच्या संख्येचा आकडा लपविण्याचा प्रयत्न केला, असे नमुद केले. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा नेमका आकडा कळाला पाहिजे. त्यासाठी आपण सरकारला जाब विचारू असेही ते म्हणाले.