…तरीही संज्या राऊत निर्लज्जासारखा म्हणतो, संजय राऊतांवर जहरी टीका

20

काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संजय राऊत यांनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी लागू केल्याने त्यांच्यावर भाजप नेत्यांनी टीका केली आहे. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं.

लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होतील असं भाकीत वर्तवलं आहे. भविष्यात ज्या राजकीय घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवेसेना भवन असेल, असा स्फोटही संजय राऊत यांनी केला होता.

संजय राऊत यांच्यावर नेहमीप्रमाणे भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतलाय. “ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचं नुकसान केलं आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, कायदा-सुव्यवस्था, महिलांवरचे अत्याचार ह्या सगळ्या विषयात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे तरीही संज्या राऊत निर्लज्जासारखा म्हणतो सेनाभवन राजकीय भूकंपाचं केंद्र होणार” असं ट्विट निलेश राणे यांनी करून संजय राऊत यांच्यावर जहरी टीकेची तोफ डागली आहे.