आधी पोटाची सोय लावा आणि नंतरच लॉकडाउन करा

12

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासकीय यंत्रणा लॉकडाउन लागू करण्यासाठी सज्ज झाली असताना शेतकरी, कामगार आणि व्यापाऱ्यांनी मात्र त्याला विरोध केला आहे.आधी पोटाची सोय लावा आणि नंतरच लॉकडाउन करा अशी विनंती कष्टकऱ्यांकडून सरकारला करण्यात आली आहे.

दुसरीकडे लॉकडाउन लागू करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करण्याचे धोरण अवलंबिले असून त्यांच्या सूचना लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

आज सुमारे ७ ते ८ हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध असल्याने त्यावर किती ताण टाकणार हा विषय लक्षात घ्यावा असेही राज्य सरकारला सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते.

आता नव्याने लॉकडाउन केल्यास अर्थचक्र ठप्प होईल अशी भीती अर्थजगतातून व्यक्त होते आहे. दुसरीकडे लॉकडाउन लागू करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करण्याचे धोरण अवलंबिले असून त्यांच्या सूचना लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.