औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या गाडीवर तालुक्यातील म्हारोळा गावात किरकोळ वादातून दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ही घटना नेमकी कशामुळे घडली याबद्दल साधक बाधक चर्चा होत आहे.
या दगडफेकीत गाडीचे बरेच नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. बिडकीन पोलीस ठाण्यात सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान, नुकतेच राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत. नेमक्या कोणत्या वादामुळे ही घटना घडली, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पैठण तालुक्यातील शिवसेनेचे संदीपान भुमरे हे राज्यातील सरकारमध्ये मंत्री आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठं यश तालुक्यात महाविकास आघाडीला मिळालं आहे.