गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा : नवाब मलिकांची मागणी

15

राज्यातील लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर मलिक यांना विचारलं असता, राज्यात 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे अजून वेळ आहे. पण लॉकडाऊनचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं ते म्हणाले. 

ज्या औषधांना वैद्यकीय मान्यता नाही, त्याविरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे. जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असं मलिक म्हणाले.

आयएमएने रामदेव बाबांना नोटीसा पाठवल्या पाहिजे, असं सांगतानाच गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

रामदेवबाबांपासून ते केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशात कोरोनाचं संकट कायम आहे. अशावेळी गोमूत्र प्यायला सांगितलं जात आहे.नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.