‘बंद’ च्या आदेशाने व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

7

पाडवा आणि लग्नसराईच्या प्रारंभालाच शासनाने ऐंशी टक्के बाजारपेठेला टाळे लावले आहे. त्यातून महापालिका क्षेत्रातील व्यापारच रसातळाला जातील अशी भिती व्यक्त होत आहे.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी साडे तीनला बैठक आहे त्यानंतरच तपशिल स्पष्ट होतील. शासनाने सुधारित आदेश काढावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा व्यापारी नेत्यांनी दिला आहे. 

व्यापारी नेत्यांनी गेले आठवडाभर आम्हाला विश्‍वासात घ्या अशी सातत्याने मागणी केली आहे मात्र आयुक्त-जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणत्याही स्वरुपात याबाबत संपर्क झाला नसल्याचे व्यापारी नेते समीर शहा यांनी “सकाळ’ ला सांगितले.

गेली दोन वर्षे व्यापारी घायकुतीला आहे. यापुढे अशी स्थिती राहिली तर व्यापाऱ्यांना जगणेच अवघड होईल. रेटून टाळेबंदी लागू केल्यास आम्ही दोन दिवसात कठोर आंदोलनासाठी तयार आहोत.