१४ मार्च रोजी होणार्या राज्य सेवा पुर्व परिक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आणि त्यानंतर राज्यसरकारला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांतील विद्यार्थ्यी या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर ऊतरले होते. याचाच फायदा घेत भाजपने या विद्यार्थ्यांचा सहारा घेत महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. त्यास प्रत्युत्तर देत संजय राऊत यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाना साधला आहे.
“एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने होतो अाहे. सरकार कोरोनाला आळा घालण्यासाठी ऊपाययपजना करीत आहे तर तेसुद्धा यांच्या पोटात दुखतं आहे. भाजपची भूमिका दुटप्पी आहे. विद्यार्थ्यांची माथी भडकवून आगीत तेल अोतण्याचे काम विरोधक करीत आहेत. तेलाचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. मात्र यांना कदाचित ते स्वस्तात ऊपलब्ध झाले असावे त्यामुळेच आगीत तेल अोतण्याचे काम हे करतायत.” अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.
संजय राऊत यांनी यासोबतच विविध मुद्द्यांवरुनसुद्धा भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एमपीएससीच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचेसुद्धा त्यांनी यावेळी म्हटले.
कोरोनाचा प्रसार जोमात असतंना नियम न पाळल्यास कडक लॉकडाऊन करावा लागेल या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास विरोधकांनी गंभीरतेने न घेणे हे मानवतेचे राजकारण नाही. तसेच कार्यसक्षम अधिकारी असणार्या तुकाराम मुढेंसारख्या अधिकार्यांची बदली करण्याची वेळ यांच्यावर का येते? असा सवालसुद्धा त्यांनी या अग्रलेखातून केला आहे.