युवासेनेचे अजब आंदोलन ! शिवसेना आणि राणेंमध्ये जुंपली

5

शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवण्यासाठी राणे कुटुंबिय नेहमिच अग्रेसर असते. मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरण आणि शिवसेनेशी संबंद्धित एपीअाय सचिन वाझे यांचे याप्रकरणात नाव पुढे आल्यानंतर भाजपने महाविकासआघाडी सरकारवर निशाना साधण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमिवरच नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यानंतर आ. नितेश राणे यांनी पत्रकारपरिषद घेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण देसाई यांच्यावर व्यक्तीगत आरोप केले. प्रसंगी युवासेनेने यावर आक्रमक भुमिका घेत नाशिकमध्ये अनोखे आंदोलन केले आणि त्यानंतर राणे विरुद्ध शिवसेना असे चित्र निर्माण झालेले आहेत.

सचिन वाझे हे मुंबईत सट्टा चालवणार्‍यांकडून हप्ते घेतात आणि त्यातील काही भाग शिवसेनेच्या काही नेत्यांना देतात असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला. तसेच वरुण देसाई यांचे सचिन वाझेंशी संबंद्ध आहेत. वरुण देसाई आणि सचिन वाझेंचे फोन कॉलची तपासणी करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली. वरुण देसाईंवर व्यक्तीगत आरोपसुद्धा यावेळी त्यांनी केली. यावर युवासेना चांगलीच आक्रमक झाली आहे.

नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन कुत्र्यांच्या गळ्यात नारायण राणे आणि नितेश राणे असे नाव असणार्‍या पाट्या बांधल्या आणि त्या कुत्र्यांना भाजप कार्यालयात सोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप करीत प्रकरण शांत केले. राणे पितापुत्र हे भाजपचे कुत्रे आहेत आणि त्यामुळे आम्ही असे आंदोलन केले असे यावेळी ऊपस्थित युवासेना कार्यकर्ते म्हणाले.

दरम्यान यानंतर वातावरण चांगलेच चिघळले असून निलेश राणे यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे. शिवसेनेची प्रकरणं बाहेर काढण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले. युवासेनेच्या या अनोख्या आंदोलनाची मात्र सर्वत्र चर्चा होते आहे.