महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सिमावाद पुन्हा एकदा ऊफाळून आला आहे. यादरम्यान शिवसेना आणि कर्नाटक सरकार यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. याच पार्श्वभूमिवर कर्नाटकचे मंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगावच नाही तर मुंबईसुद्धा कर्नाटकचा भाग असल्याचे विधान केले होते. परंतू आता त्याहीपेक्षा मोठा दावा कर्नाटक सरकारमधील ऊपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी केला. त्यांनी थेट छ.शिवाजी महाराजांवर दावा करत छ.शिवाजी महराजांचे वंशज हे कर्नाटकचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजसुद्धा कर्नाटकचे आहेत असा दावा केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहीत नाही. त्यांनी तो वाचलाही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकमधील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे होते, असा अजब दावा गोविंद कार्जोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. याशिवाय, कर्नाटकात दुष्काळ पडल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेले होते. असे बेताल वक्तव्यसुद्धा त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्रात उद्धव महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. सध्या काँग्रेस अस्वस्थ आहे. काँग्रेस कधीही शिवसेनेचा पाठिंबा काढून घेऊ शकते. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याची सतत भीती वाटत असून त्यामुळेच ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमेबाबत लक्ष विचलित करणारी विधाने करत आहेत, असे गोविंद कार्जोळ यांनी म्हटले आहे. यांच्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. सध्या काँग्रेस अस्वस्थ आहे. काँग्रेस कधीही शिवसेनेचा पाठिंबा काढून घेऊ शकते. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याची सतत भीती वाटत असून त्यामुळेच ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमेबाबत लक्ष विचलित करणारी विधाने करत आहेत, असे गोविंद कार्जोळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बेळगाव, कारवार आणि निपाणीसह वादग्रस्त सीमाभाग प्रकरण न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत हा परिसर केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली होती. छ.शिवाजी महाराजांवर दावा केला असल्यामुळे शिवप्रेमींमध्ये आणि शिवसेनेत नाराजीचे वातावरण आहे. अद्याप महाराष्ट्रातून यावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.