सासुरवासाच्या अनेक छळवणुकीच्या घटना आपण ऐकल्या आहेत. परंतू कोरोनाकाळाने या घटनांनासुद्धा बदलते स्वरुप दिले आहे. कोरोनाबाधीत झालेल्या एका महिलेने आपल्याला आयसोलेशनमध्ये एकटे राहावे लागेल. आणि मग आपले कसे होणार या भितीने चक्क स्वत:च्याच सुनेला मिठी मारुन कोरोना पॉझीटीव्ह केले.
सदर घटना ही तेलंगनातील सोमरीपाटा या गावातील आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर त्या महिलेस घरातच आयसोलेट करण्यात आले. सदर महिलेच्या संपर्कात आल्याने आपल्यालासुद्धा कोरोना होणार या भितीने घरच्यांनी तीच्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी महिलेचे मानसिक खच्चीकरण झाले. आणि तीने आपल्या सुनेलाचा जवळ अोढून तीची गळाभेट घेतली. यानंतर सुनेची चाचणी केली असता, तीचा कोरोना अहवालसुद्धा पॉझीटीव्ह आला.
“मला कोरोना झालाय म्हणून मला एकटीला सगळ्यांनी टाकुन दिलयं. तुलासुद्धा कोरोना झाला पाहिजे असं म्हणत सासुने मला जबरदस्तीने स्वत:कडे अोढत मिठी मारली” असे सुनेने आरोग्यअधिकार्यांशी बोलतांना सांगीतले.
टाईम्स अॉफ ईंडीयाच्या वृत्तानुसार सुनेचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर तील गावकर्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. गावकर्यांनी तीला गावातून काढून टाकले. त्यानंतर या महिलेच्या बहिनीने तीला मदत केली असून राजन्ना सिरसीला जिल्ह्यातील थिम्मापुर या गावी तीच्यावर ऊपचार सुरु आहे.